करोना व्हायरसच्या भीतीने चीनने औषधं पोहोचवण्यासाठी शक्य तिथे ड्रोन्सचा वापर केल्याच्या बातम्या तुम्ही पाहिल्या असतील. ड्रोन्सचा हा वापर नाही. विशेषत: नैसर्गिक आपत्तीच्या वेळी कित्येक ड्रोन्सची मदत होते आहे. वैद्यकीय मदत पथकं रुग्णांच्या सेवेत असताना औषधं, अन्न आणि इतर सामान वेगाने मदतस्थळी पोहोचवायची असतील तर ड्रोन्स उत्तम ठरतात. त्यामुळे त्यांचा असा वापर वाढत जातो आहेएखादी वस्तू ऑर्डर केली किंवा एखाद्या ऍपवरून पिझ्झा मागवला, तर एक माणूस येऊन ते आपल्या हाती देतो. पण कधी आपण नेमकं घरी नसतो आणि वस्तू परत जाते किंवा कधी घरी पोहोचतो तेव्हा पिझ्झा पार थंडगार होऊन गेलेला असतो. मग होते आपली चिडचिड. दुसरीकडे हा वितरण करणारा माणूस दिवसभरात कठे कठे कसा कसा फिरत जाईल आणि योग्य वेळेत योग्य सामान पोहोचवेल याचं गणित मांडता मांडता कंपन्यांच्या नाकीनऊ येतात. त्यातून वस्तू गहाळ होणे, मध्येच चोरीला जाणे, अशा कटकटींचा सामना त्यांना करावा लागतो. तिसरीकडे ट्रॅफिक जॅम आणि वाहन वेगाने चालवण्यातला धोका याने तो वितरक माणूस त्रस्त होतो. __यावर उपाय म्हणून इतर ठिकाणीही डिलिव्हरी ड्रोन्सचा वापर करण्याची कल्पना आता मूळ धरते ड्रोन असतं एक छोटं उडतं स्मार्ट यंत्र, संपूर्णपणे स्वायत्त म्हणजेच स्वत: निर्णय घेऊन मार्गक्रमण करणारं, सामान सोबत घेऊन दिलेल्या ठिकाणी पोहोचवणारंत्याला जीपीएस यंत्रणा असते आणि गरजेनुसार व मेरा, स्पीकर्स आणि काही खास उपकरणं असू शकतात. ड्रोन्समुळे वेळेची बचत होते, कमी खर्चात स्वित्झर्लंड, सिंगापूर या देशांमध्ये पोस्ट पार्सलसाठी ड्रोन्सच्या चाचण्या झाल्या आहेत. आज वैद्यकीय उपकरणं, औषधं, अन्न, रुग्णाचे पॅथॉलॉजिकल नमुने, महत्त्वाची कागदपत्रं यासाठी ड्रोन्सचा वापर होत असला, तरी उद्या कोणतीही वस्तू आपल्याकडे ड्रोन्सवरून येताना नवे तंत्रज्ञान आपल्या आयुष्यात स्थिरावयाला लागलं की आपोआप त्याच्याविषयी कायदे येतात, नियम आणि दंड येतात. पण म्हटलं तर वेग, सुरक्षा आणि खर्चाच्या बाबतीत वरचढ ठरणारे ड्रोन्सखरोखरच वितरणासाठी एक पर्यावरणस्नेही मार्ग होऊ शकतो.
डिलिव्हटी डोन्स