___ठाणे : दोन कोटींची फसवणूक करून अपहार करणा-या दोन आरोपींना ५ तासाच्या आत मध्यप्रदेशातील खांडवा येथून अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आलं आहे. मालाडमधील अक्षय परवडी हे काम करत असलेल्या कंपनीच्या मालकांना त्यांच्या ओळखीच्या विनोदकुमार झा यानं ६ कोटीचं कर्ज मिळवून देण्याचं आमिष दाखवून त्यांचा विश्वास संपादन केला. हे कर्ज मिळवण्यासाठी २ कोटी रूपये सिक्युरिटी डिपॉझिट म्हणन बँकेत ठेवावे लागतील असं सांगून विनोदकुमार झा नं त्यांच्याकडून २ कोटी रूपये घेतले. हे पैसे त्याने ठाणे रेल्वे स्थानकाजवळ बँक कर्मचारी असल्याचं भासवन अनोळखी इसमाला आणले आणि कोटीची रक्कम घेऊन बँकेत भरणा करून पावती आणून देतो असं सांगितलं. नंतर हे दोघेही पैसे घेऊन पसार झाले. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर विनोदकुमार झा आणि त्याच्या साथीदाराच्या शोधासाठी पोलीसांनी पथकं निर्माण केली. त्यावेळी गन्हे शाखेच्या पोलीसांना हे दोघेजण पवन एक्सप्रेसनं बिहारकडे जात असल्याची माहिती मिळाली. पोलीसांनी एक पथक मध्यप्रदेशमध्ये पाठवलं होतं. त्यावेळी विनोदकुमार झा आणि अतिसार अमितकुमार यादव अशा दोघांना मध्यप्रदेशमधील खांडवा येथून ताब्यात मनाया घेण्यात आलं आणि त्यांच्याकडन दोन कोटीची रोख रक्कम हस्तगत करण्यात आली.
__करणाऱ्या दोन आरोपींना अटक