मुंब्रा पोलीसांकडून १२ लाख ९८ हजार रूपये किंमतीची एमडी पावडर जप्त

ठाणे (प्रतिनिधी) ठाण्यातील मुंब्रा रेतीबंदर रोड परिसरात एमडी पावडर (मेफेड्रोन) या अंमली पदार्थांची विक्री करण्याच्या उद्देशाने दुचाकीवरुन आलेल्या दोघा संशयितांना पोलीसांनी ताब्यात घेवून झडती घेतली असता मनिष कुमार बोरीचा याच्याकडून १२,६५,000/- रू. किंमतीची २५३ ग्रॅम वजनाची लास्टीकच्या पिशवीमध्ये पांढ-या रंगाची मेफेड्रॉन (एमडी) पावडर मिळून आल्याने अटक करण्यात आली आहे.
    मुंब्रा पोलीस ठाण्याचे एनडीपीएस पथकाचे पोलीस शिपाई उदय किरपण यांना दिनांक २ फेब्रुवारी २०२० रोजी गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमी नुसार रेतीबंदर येथील सर्वीस रोड, जुना मुंबई पुणे हायवे, मुंब्रा याठिकाणी एक इसम एमडी पावडर (मेफेड्रॉन) या अंमली पदार्थाची विक्री करण्याकरीता येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळताच सदर बातमीची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक/श्री.मधुकर कड यांना कळवीण्यात आली. व पोनिरी/श्री.कड यांनी श्री.सुभाष बुरसे,पोलीस उप आयुक्त,परिमंडळ-१,ठाणे शहर, श्री.सुनिल घोसाळकर,सहाय्यक पोलीस आयुक्त,कळवा विभाग यांना माहिती कळवीली. मा.वरिष्ठांनी दिलेल्या सुचनां व आदेशाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक/श्री.मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक/अरूण क्षिरसागर,पोलीस उप निरीक्षक/दिपक घुगे, पोना/ कमलाकर भोये,पोशि/उदय किरपण,पोशि/सुदिप हुलवान, पोशि/योगेश पाटील,पोशि/छोटु दाभाडे, पोशि/भुषण खैरनार यांनी रेतीबंदर येथिल सर्वीस रोड, जुना मुंबई पुणे हायवे, मुंब्रा येथे सापळा रचला.
रात्रौ ९:५५ वा. चे सुमारास संशयीत इसम मनिष कुमार बोरीचा, वय ३४ वर्षे,रा. उमर खाडी,भायखळा,मुंबई व त्याचा साथिदार रवी खोडा भाईवाला,वय ३२ वर्षे, रा. कलकत्ता वाला इस्टेट बिल्डींग, डॉ.डी.बी. मार्ग,मुंबई हे दुचाकीवर मिळून आले. त्यांना ताब्यात घेवून झडती घेतली असता मनिष कुमार बोरीचा याचे अंगझडतीमध्ये १२,६५,000/- रू. किंमतीची २५३ ग्रॅम वजनाची लास्टीकच्या पिशवीमध्ये पांढ-या रंगाची मेफेड्रॉन (एमडी) पावडर मिळून आल्याने दोघांना पोलीसांनी अटक रून दोन्ही आरोपीतांकडून मेफेड्रॉन (एमडी) पावडरसह गुन्हयात वापरलेले वाहन,मोबाईल फोन,रोख क्कम मिळून एकुण १२,९८,३०० रूपयांचा मुददेमाल हस्तगत करून त्यांचे विरूध्द मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद क्रमांक ॥ १४२/२०२० एनडीपीएस कायदा कलम ८ (क),२२ (क),२९ अंतर्गत दि.३/२/२०२० जी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
  सदर कारवाई श्री.विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे शहर, श्री.सुरेश ला, पोलीस सह आयुक्त, श्री.अनिल कुंभारे, अपर पोलीस आयुक्त,श्री.सुभाष बुरसे, पोलीस उप युक्त, परिमंडळ-१,ठाणे, मा.श्री.सुनिल घोसाळकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, कळवा विभाग, वरिष्ठ स निरीक्षक श्री.मधुकर कड यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून गुन्हयाचा पुढील तपास मुंब्रा ठाण्याचे पोलीस निरीक्षक जी.एम.मुजावर हे करीत आहेत.