डॉ विजय सर्यतशी केडीएमसीचे नवे आयक्त

कल्याण (नितीका राव) : कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांची बदली झाली २०१८ आहे. त्यांच्या जागी रायगडचे - । कार्याल जिल्हाधिकारी डॉ विजय सूर्यवंशी यांची शासनाने नियुक्ती केली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी म्हणून काम करीत असतानाच डॉ सूर्यवंशी यांनी अलिबाग येथील सीआरझेड परिसरात असलेल्या सेलीब्रेटींच्या व बडया उद्योजकांच्या अनधिकृत बंगल्यावर धडक कारवाई केली. सूर्यवंशी हे सहकार विभागातील अधिकारी आहेत. माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे खासगी - अलिबाग सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. पालघरचे सीईओ, नाशिकला जिल्हा उपनिंबधक अधिकारी म्हणून त्यांनी काम केले आहे. डॉ सूर्यवंशी हे मुळचे नाशिक जिल्हयातील सटाना तालुक्यातील रहिवाशी आहेत. उत्तम  प्रशासक व कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनात त्याची ओळख आहे. काही दिवसांपूर्वीच डॉ. सूर्यवंशी यांची पुणे महानगर परिवहन न महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदावर त्यांची बदली करण्यात आली होती. मात्र ती बदली रद्द करण्यात आली असून कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.