ठामपात अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या

ठाणे(प्रतिनिधी) - ठाणे महापालिकेत उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या असून यामध्ये काही अधिकाऱ्यांची महत्वाची खाती काढून त्यांची दसऱ्या विभागात बदली करण्यात आली आहे . चार उपायुक्त आणि चार सहाय्यक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे . ___ठाणे महापालिकेच्या उपायुक्त, तसेच सहाय्यक आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये शिक्षण विभागाच्या वादग्रस्त प्रस्तावांमुळे टीकेचे धनी झालेले उपायुक्त मनीष जोशी यांच्याकडून शिक्षण विभागाचा कार्यभार काढून टाकण्यात येऊन त्यांना सचिव पदी बदली करण्यात आली आहे. जोशी यांच्याकडे घनकचरा विभाग, घनकचरा प्रकल्प, जिद्द शाळा, महापालिका सचिव (अतिरीक्त कार्यभार) सोपविण्यात आला आहे. तर महापालिका सचिव असलेले अशोक बुरपुल्ले यांच्या - अतिरिक्त असलेला सचिव पदाचा कार्यभार काढून टाकण्यात आला असून परिवहनचे व्यवस्थापक पद त्यांना देण्यात आले आहे. तसेच अतिक्रम नियंत्रण व निष्कासन, स्थावर मालमत्ता आणि सुरक्षा यांची जबाबदारी त्यांच्यावर कायम ठेवण्यात आली आहे. परिमंडळ ३ वरुन त्यांना परिमंडळ एकवर आणण्यात आले आहे. तर परिवहन व्यवस्थापक पदी असलेले संदीप माळवी यांची यांच्याकडे पुन्हा माहिती व जनसंपर्क परवाना, क्रिडा व सांस्कृतिक, आपत्तीव्यवस्थापन, जाहीरात, चिंतामणराव देशमुख प्र. प्र. संस्था आणि अभिलेख कक्ष यांच्या जबाबदा:या कायम ठेवण्यात आल्या आहेत. वर्षा दिक्षीत यांच्या खांद्यावर आता परिमंडळ तीनची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. दुसरीकडे नौपाडा कोपरी प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त मारुती गायकवाड यांची .. मुंब्रा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे. तर शंकर पाटोळे यांच्या उथळसरवर वरुन नौपाडा, कोपरी प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त पदी बदली करण्यात आली आहे.प्रणाली घोंगे यांची सामान्य प्रशासन विभागातून उथळसर प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.