मध्य रेल्वेवर प्रवास करताना चे नियम बदलण्याची वेळ आली आहे!

 


त्यासाठी आपण सर्वांनी मिळून मोहीम सुरु केलीच पाहिजे..


सीएसटी आणि कर्जत ला बसलेला माणूस हा 'ठाणे' स्टेशन ला उठलाच पाहिजे. नसेल उठत तर त्याला समजवा!!!


कल्याण,डोंबिवली,दिवा, ला उतरणाऱ्यानी कर्जत,कसारा, बदलापूर लोकल पकडू नका! तुम्हाला हात जोडून विनंती आहे काही दिवसांपूर्वी एक मुलगा याच गोष्टीमुळे खाली पडला..
आपल्यासाठी दर १० मिनिटांना ट्रेन असते पण त्यांना ४५ मिनिटाने एक ट्रेन असते.. एकदा विचार करा..


तुमचं स्टेशन येण्यापूर्वी निदान २ स्टेशन आधी बाहेर या. स्टेशन आल्यावर जागेवरून उठणे किंवा बाहेर येणे ही सवय आता सोडायची वेळ आलेली आहे..


फर्स्ट क्लास मध्ये सीएसटी ला बसलेला माणूस त्याचं स्टेशन आल्याशिवाय उठत नाही... त्यांना सुद्धा नम्र विनंती आहे आपण आता बदललो तर आणि तरच येणारी पिढी आदर्श घेईल..त्याचे परिणाम सुद्धा दूरगामी दिसतील..


आमच्या महिलावर्गाला सुद्धा नम्र विनंती आहे की गर्दीच्या वेळी सुट्टीच्या दिवशी जेन्ट्स डब्यामधून प्रवास करू नका.. कारण तुम्हाला धक्का लागू नये या नादात बाकिंच्यांचे हाल होतात...


सर्वात शेवटी कपल्स लोकांना एवढंच सांगणं आहे, 'प्रेम आम्ही ही केलं', 'मुली आम्हीही फिरवल्या' पण लोकल मधून प्रवास करताना तिला नेहमी महिलांच्याच डब्यात जायला सांगितलं... ती जागा नाही प्रेम आणि काळजी दाखवण्याची.. तुमच्यामुळे ही खूप त्रास होतो.. अपेक्षा आहे समजून घ्याल..
 आणि हल्ली ज्या सॅक वापरतात त्यासुद्धा निट वापरा गाडीत चढल्यावर पाठीवर किंवा पोटावर न घेता हातात धरा व्यात जेणेकरून इतरांना त्रास होणार नाही व थोडेसे अजून प्रवासी प्रवास करू शकतील.
सीएसटी ते ठाणे या शहरात राहणाऱ्या माझ्या मित्र-मैत्रीणीना विनंती आहे, 'तुम्हाला खरंच माहित नाही आम्ही कसा प्रवास करतो ते', गेल्या कित्येक वर्षात सकाळच्या वेळी आणि संध्याकाळच्या वेळी आम्हाला बसायचं सोडा साधं नीट उभं राहायला सुद्धा जागा मिळाली नाही आहे.. कित्येक जीव असेच गेले..


आपल्या १० मिनिट लवकर घरी जाण्याच्या नादात एखाद्याच्या आयुष्यात अंधार येईल असं कृत्य करू नका!


आम्हाला साथ द्या.. जास्तीत जास्त लोकांना आपल्या या मोहिमेत सामील करा!
ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करून सामील व्हा!


-आपलाच प्रवासी मित्र.