ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटीतर्फे क्रिकेट लीगचे आयोजन

 ठाणे : ज्ञानराज स्पोर्ट्स कमिटीतर्फे (डिएससीए ) यंदाही मर्यादित षटकांच्या सिझन बॉल एकदिवसीय क्रिकेट लीग स्पर्धे चे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत १६ संघाना प्रवेश देण्यात आला आहे. त्यात यजमान डीएससीए , श्री माँ गुरुकुल, अवर क्रिकेट क्लब, साळगावकर स्पोर्ट्स क्लब, इन्फिनिटस्पोर्ट्स अकॅडेमी, ठाणे शहर पोलीस, व्हर्टूस स्पोर्ट्स क्लब, युनियन क्रिकेट अकॅडेमी, रायझिंग क्रिकेट क्लब , चॅलेंज स्पोर्ट्स क्लब, पॅब क्रिकेट क्लब, मंबई क्रिकेट अकॅडेमी, स्पीड स्पोर्ट्स क्लब, मंबई स्पोर्टीन यनियन, अंबरनाथ क्रिकेट अकॅडेमी, रॉयल वॉरियर्स क्रिकेट फाउंडेशन या संघाचा समावेश आहे. स्पर्धेचा उद्घाटनीय सामना ३ फेब्रुवारी रोजी यजमान डिएससीए आणि विरार येथील अवर क्रिकेट क्लब यांच्यात रंगणार आहे. याशिवाय स्पर्धेतील सामने भिवंडीतील सोनाळे मैदान, मुंबईतील आझाद मैदान ससानीयन मैदानावर खेळवण्यात येणार आहेत. स्पर्धे त ठाणे मुंबई परिसरातील नामवंत संघ सहभागी झाले आहेत. ठाणे महापालीका शिक्षण समितीचे सभापती आणि महाराष्ट्र माझा संस्थेचे प्रमख विकास रेपाळे यांच्या प्रयत्नामुळे स्पर्धेचा अंतिम सामना दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृहात खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना आणि प्रत्येक सामन्यातील सामनावीराला आकर्षक पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे .