ठाणे : ठाणे शहरातील सार्वजनिक शौचालयांची साफ-सफाई व्यवस्थिरित्या होत नसल्याबाबतच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या असता उपमहापौर पल्लवीताई कदम यांनी घनकचरा विभागाचे अधिकारी यांचे समवेत शहरातील काही सार्वजनिक शौचालयाची प्रत्यक्ष पाहणी केली त्यावेळी स्वच्छतेबाबत काही त्रुटी निदर्शनास आल्या यामध्ये प्रामुख्याने अपुरे मनुष्यबळ, पाण्याची कमतरता यामुळे साफ-सफाई करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत असून यावर उपाय म्हणुन प्रेशरजेट मशिन वापरल्यास पाण्याची बचत होईल व मनुष्यबळ देखिल कमी लागेल व कमी वेळात जास्तीत-जास्त शौचालये साफ करता येतील ही संकल्पना पुढे आली. याकरिता प्रभाग निहाय किंवा हजेरी शेड निहाय एक प्रेशर जेट मशीन स्वच्छता निरीक्षकांकडे उपलब्ध करुन देण्याची मागणी महापौर व आयुक्त यांच्याकडे करण्यात आली निदर्शनास आल्या यामध्ये प्रामुख्याने अपुरे मनुष्यबळ, पाण्याची कमतरता यामुळे साफ-सफाई करणे शक्य होत नव्हते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत असून यावर उपाय म्हणुन प्रेशरजेट मशिन वापरल्यास पाण्याची बचत होईल व मनुष्यबळ देखिल कमी लागेल व कमी वेळात जास्तीत-जास्त शौचालये साफ करता येतील ही संकल्पना पुढे आली. याकरिता प्रभाग निहाय किंवा हजेरी शेड निहाय एक प्रेशर जेट मशीन स्वच्छता निरीक्षकांकडे उपलब्ध करुन देण्याची मागणी महापौर व आयुक्त यांच्याकडे करण्यात आली असल्याचे उपमहापौर पल्लवीताई कदम यांनी सांगितले. त्याचप्रमाणे डिसेंबर महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत याविषयी दिलेल्या प्रस्तावाच्या सूचनेस मा.सर्वसाधारण सभेने मान्यता दिलेली आहे. ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात एकुण ५२ हजेरी शेड असून प्रत्येकी एक मशिन उपलब्ध करुन दिल्यास ह्याचा खर्चही आवाक्यात येईल. सार्वजनिक शौचालयाची सफाई प्रेशर जेट मशिनच्या सहाय्याने सुरु करण्याकरिता उपमहापौर पल्लवीताई कदम यांनी स्वखर्चाने एक प्रेशरजेट मशिन उपलब्ध करुन दिले आहे.
सार्वजनिक शौचालये प्रेशर जेट मशिनच्या सहाय्याने स्वच्छ करा-उपमहापौर