मुंबई दि. १२ फेब्रुवारी -सरकार एकाही पूरग्रस्त शेतकऱ्याचे नुकसान होऊ देणार नाही. पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या कर्जाचा प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील महापूरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची बैठक आज मंत्रालयात बोलावण्यात आली होती. या बैठकीत पुरग्रस्त शेतकऱ्यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. त्यादरम्यान झालेल्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांचा प्रश्न तात्काळ सोडविण्यासाठी सरकार कटीबध्द असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले