फेबवारीपर्यंत थकबाकीसह कर भरल्यास दंडामध्ये सवलत योजना

 


ठाणे (प्रतिनिधी)-मालमत्ता कराच्या थकीत रकमेसह चालू वर्षाचा मालमत्ता कर फेब्रुवारी अखेरपर्यंत भरल्यास नागरिकांना दंडाच्या आणि व्याजाच्या रकमेमध्ये ५० टक्के सवलत देण्याचा महत्वाचा निर्णय ठाणे महानगरपालिकेच्यावतीने घेण्यात आला असून नागरिकांनी वेळेत आपला मालमत्ता कर भरून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के आणि महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी केले आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ज्या करदात्यांनी अद्यापपर्यत मालमत्ता कराचा भरणा केलेला नाही अशा करदात्यांविरुध्द मालमत्ता अधिनियमातील तरतुदीनुसार प्रभागस्तरावर कडक कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर मालमत्ता करावर आकारलेला दंड/ व्याज यामध्ये सूट दिल्यास मालमत्ता कर भरणे सुलभ होईल अशी मागणी करदात्यांकडून सातत्याने होत होती. म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या योजनेतंर्गत जे नागरिक देय असलेला थकीत मालमत्ता कर चालू मागणीसह १ फेब्रुवारी २०२० ते २९ फेब्रुवारी २०२० पर्यंत एक रकमी भरतील अशा करदात्यांना त्यांच्या मालमत्ता करावरील दंड/ व्याजाच्या रक्कमेमध्ये ५० टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच जे करदाते १ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२० पर्यंत देय होणारा थकीत मालमत्ता कर चालू मागणीसह अधिक प्रशासकीय आकाराच्या ६० टक्के रक्कम एक रकमी भरतील अशा करदात्यांना त्यांच्या मालमत्ता करावरील दंड/ व्याजाच्या रक्कमेत ४० टक्के सूट देण्यात येणार आहे.


या योजनेचा लाभ घेण्यासाठी कराची थकबाकी असल्यास संपूर्ण थकबाकी, संपूर्ण चालू मागणी आणि सूट नंतरची देय दंड/ व्याजाची रक्कम विहित मुदतीमध्ये एकत्रित जमा करणे अनिवार्य आहे. ज्या करदात्याने मालमत्ता कराची संपूर्ण रक्कम दंडासह या योजनेपूर्वी भरली असेल त्यांना ही सूट लागू असणार नाही. दरम्यान नागरिकांना कराची रक्कम भरणे सुलभ व्हावे यासाठी महापालिकेच्या प्रभाग कार्यालयाकडील सर्व संकलन केंद्रावर कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी तसेच सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी व दुसरा व चौथा शनिवार या दिवशीही सकाळी १०.३० ते सायं. ५.०० आणि रविवारी सकाळी १०.३० ते दुपारी १.३० या वेळेत कराची रक्कम भरता येईल. त्याचप्रमाणे महापालिकेच्या येईल. त्याचप्रमाणे महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने कर भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तसेच ठाणे महानगरपालिकेच्या ऊळसळढहरपश या पव्दारे सुध्दा मालमत्ता कराची रक्कम भरल्यास विशेष सवलत मिळू शकेल. महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.