वेब मिडिया असोसिएशन बैठक दि. १८ मार्च रोजी मुबंई येथे.

 


महाराष्ट्रातील सर्व वेब न्युज पोर्टल संपादक,संचालक या सर्वांना कळविण्यात येते की, जिल्हा पातळीवर व तालुका पातळीवर वेब न्युज पोर्टल चालवणाऱ्या पत्रकार बांधवांची  साठी एक संघटित वेब मिडिया असोसिएशन सुरु करण्यात आली आहे. यांचे अध्यक्ष वरिष्ठ पत्रकार व गर्जा महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक अनिल महाजन हे आहेत. पत्रकार बांधवांच्या न्याय  हक्कासाठी या वेब मिडिया असोसिएशनची निर्मिती करण्यात आली आहे. या वेब मिडिया असोसिएशनचा (नोंदणी क्रमांक:- २८४/२०२० जी.बी.बी.एस.डी मुंबई महा) आहे. डिजिटल इंडिया मध्ये वेब मीडिया म्हणजे हा नवीन प्रवाह आला आहे.जलद गतीने सर्व सामान्य जनतेपर्यंत वेब मिडीयाच्या माध्यमातुन बातमी पोहचवण्यास मदत होते.महाराष्ट्रात जवळ जवळ तालुका व जिल्हा पातळीवर एकूण अंदाजे १५ ते २० हजार वेब पोर्टल कार्यरत आहेत व ते  नियमित पणे सुरु आहेत.
परंतु केंद्र शासनाने व राज्य शासनाने  यांच्या साठी कुठलेही धोरण निश्चित केलेले नाही आहे. वेब मिडियासाठी केंद्र शासनाची सूचना एवं प्रसारण मंत्रालय MINISTRY OF INFORMATION AND BROADCASTING   ची कुठलीही मिडिया पॉलिसी अद्याप अस्तित्वात  आणलेली नाही.केंद्र सरकार ने लवकरात लवकर वेब मीडियासाठी मीडिया पॉलिसी आणावी. यांचा पाठपुरावा करण्यासाठी वेब मिडिया असोसिएशन ह्या शासनमान्य संघटनेची निर्मिती करण्यात आली आहे. या असोसिएशनच्या माध्यमातून   मा.श्री प्रकाश जावडेकर साहेब  केंद्रीय मंत्री सूचना माहिती प्रसारण दिल्ली यांच्या कडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.जेणे करून वेब मीडियाच्या प्रत्येक वेब न्यूज पोर्टल धारकला अधिकृत  निकष ठरवून RNI क्रमांक मिळावा


वेब मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष  श्री अनिल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व एकूण ०९ संचालक सदस्य वेब मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष अनिल महाजन यांच्या अध्यक्षतेखाली व संचालक सदस्य (०१) इरफान शेख (०२)गणेश पुजारी (०३)अभिजित पाटील(०४)आनंद शर्मा(०५)अयाज मोहसिन(०६)नरेंद्र कसबे (०७)माऊली डांगे(०८) प्रमोद दंडगव्हाण यांच्या उपस्तिथीत दिनांक १८/०३/२०२० रोजी राज्य भरातील सर्व वेब मीडिया न्युज पोर्टलच्या संपादकांची बैठक बांद्रा मुंबई येथे आयोजित करण्यात आली आहे वेब मिडिया असोसिएशन मध्ये सभासद होऊ इच्छिणाऱ्या सर्व वेब पोर्टलच्या संपादकांनी व पत्रकारांनी  उपस्तिथ राहावे.
  
राज्यातील वेब मीडियाच्या सर्व न्युज पोर्टलच्या संपादकांना व पत्रकांराना  सूचित करण्यात येते कि आपणही या वेब मिडिया असोसिएशचे अधिकृत सभासद होऊ शकतात.यासाठी वेब मिडिया असोसिएशनच्या ईमेल आयडीवर किंवा व्हाट्सअप वर आपल्या पोर्टलचे पूर्ण नाव व आपला संपर्क नंबर पाठवावे. 


*दिनांक १८/०३/२०२० रोजी दुपारी २:०० ते सायंकाळी ०५:०० या वेळेत* वेब मिडिया असोसिएशन कार्यालय मुंबई येथे सर्व वेब पोर्टल संपादक (मालक) यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्वांनी या बैठकीला आवर्जून उपस्तिथ राहावे. 


*बैठकीचे ठिकाण*
*दिनांक १८/०३/२०२० रोजी दुपारी ०२:०० ते ०५:००*
*वेब मीडिया असोसिएशन & गर्जा महाराष्ट्र न्युज समूह मुख्य* *कार्यालय,पिनॅकल कॉर्पोरेट पार्क, ५ वा मजला, ५०१,ट्रेड सेंटरच्या बाजुला, बीकेसी* वांद्रे पूर्व (५१).


संपर्क
*इरफान शेख*           गणेश *पुजारी संचालक सदस्य                     कार्यालय सचिव*
*९८६०३५११८२                                  ८७८८४५३३७७*
*Email id: - webm.association@gmail.com*