ठाणे : ऐतिहासिक अशा ठाणे रेल्वे स्थानकातून भारतातील पहिली रेल्वे सुरू झालेल्या ठाणे रेल्वे स्थानकातून पहिली एसी रेल्वे लोकल सेवा सुरू करावी अशी मागणी खासदार राजन विचारे हे सुरुवातीपासून करीत होते त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून मध्य रेल्वेने ट्रान्स हार्बर व हार्बर मार्गावर एसी लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आज पासून ही सेवा सुरू करण्यात येत आहे. काही वर्षांपूर्वी भावेश नकाते याचे गर्दीमुळे अपघाती निधन झाल्यानंतर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या आदेशानुसार मध्य रेल्वेने रेल्वे महाव्यवस्थापक एस के सूद यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमण्यात आली होती कमिटीच्या सदस्य खासदार राजन विचारे असताना त्यांनी सन २०१६ ठाणे ते पनवेल एसी लोकल सुरू करावी अशी मागणी त्या बैठकीमध्ये केली होती व त्यांना पत्रही दिले त्यानंतर रेल्वेने या विषयाचे गांभीर्य उचलून घेऊन नियोजन करण्यास सुरुवात केली त्याला यश आले असून रेल्वे सेवा ठाण्यातून सुरू करावी असा निर्णय घेण्यात आला परंतु ठाणे रेल्वे स्थानकात फलाटांची संख्या कमी असल्याने या तांत्रिक अडचणीमुळे प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने यांचे उद्घाटन पनवेल येथून करण्यात आले आहे ही येणारी पहिली लोकल सायंकाळी चार वाजता ठाणे येथे येणार असून ठाण्यावरून पुन्हा पनवेल ला निघणार आहे.
खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश ठाणे ते पनवेल पहिली एसी लोकल सुरू