जोगिला तलाव पुनर्जीवित करण्याच्या कामाला वेग

ठाणे (वार्ताहर)जोगिला तलाव पुनर्जीवित करण्याच्या कामाला वेग आला असून पावसाळ्यापूर्वी प्रत्यक्षात तलावात पाणी साठा सुरु होईल असा प्रयत्न महापालिकेचा असल्याची माहिती पालिका आयुक्त संजीव यांनी दिली आहे. जोगिला तलावाचे पुनर्वजीवित करण्याचे काम पालिकेच्या माध्यमातून सुरु असून शनिवारी पालिका आयुक्तांनी या कामाची पाहणी केली, या पाहणीमध्ये या तलावाला शुद्ध पाण्याचे झरे लागले असून स्वतः पाण्याची चव आयुक्तांनी यावेळी घेतली. तलावात पुन्हा माती जाऊ नये म्हणून एका महिन्याच्या आत गॅबियन वॉलचे काम पूर्ण करण्यात येणार त गाबयन वालच काम पूर्ण करण्यात यणार असून संपूर्ण माती देखील काढली जाणार आहे . तर डाव्या बाजूने तलावाचे विस्तारीकरण करण्याबरोबरच तलावाच्या समोर डीपी रोडचे देखील काम करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पषट केले आहे. निरीच्या सल्ल्यानंतर जोगिला तलावाला पुनर्जीवित करण्याचे काम ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरु असून वेळोवेळी पालिका आयुक्तांनी या तलावाच्या कामाची पाहणी चा पाहणा केली आहे .



शनिवारी देखील या कामाचा आढावा पालिका आयुक्तांनी घेतला असून झालेल्या कामाबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले आहे . तलावाची पाहणी केल्यानंतर या तर या ठिकाणी स्वच्छ पाण्याचे झरे लागले असून या सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी सांगितले. उजव्या बाजूला गॅबियन वॉल बांधण्याचे काम सुरु असून डाव्या बाजूला उथळसर प्रभाग समितीचा येत असलेला भाग काढण्यात येणार असून त्या ठिकाणी तलावाचे विस्तारीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तलावापर्यंत जाण्यासाठी समोर डीपी रोडचे काम करण्यात येणार असून यामध्ये बाधित होणाऱ्या ८० झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वे करून त्यांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. २४ तास डी वॉटरिंग करूनही पाण्याचा फ्लो जास्त असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे . या ठिकाणी जी शाळा होती ती शाळा एका संस्थेला देण्यात आली असून त्याच्या मागे टेखील १० देखील १२५ झोपड्या आहेत . या झोपड्याचे पुनर्वसन कर करण्यासाठी आणि प्रभाग समिती कार्यालय अशी स्वतंत्र इमारत बांधण्याचा स्वतंत्र प्रस्ताव तयार करण्याचे नियोजन असल्याचे संजीव जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे .