ठाणे : मराठा मंडळातर्फे प्रतिवर्षाप्रमाणे बुधवार दि. १९ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी १० ते दु. २ वा. राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह, तलावपाळी , ठाणे येथे शिवजयंतीचा उत्सव आपल्या अमूल्य सहकार्याने साजरा केला जाणार आहे. सकाळी ८ वा. मासुंदा तलावपाळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास मराठा समाजातर्फे पुष्पहार अर्पण व अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच खुली सामुहिक नृत्य स्पर्धा सकाळी ८ ते १० वा. राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृह, तलावपाळी , ठाणे येथे होणार आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित दर्या भवानी या ऐतिहासिक नाटकाचा प्रयोग करण्यात येईल. या प्रसंगी मान्यवर पाहण्यांचे हस्ते मंडळाचे मानाचे पुरस्कार सत्कारमूर्ती उमेश दत्तात्रय साळवी (निवृत्त न्यायमूर्ती, उच्च न्यायालय महाराष्ट्र गोवा. न्यायिक सदस्य राष्ट्रीय हरित लवास), डा. लाना प्रविण नाईक (पथालाजीक विभाग प्रमुख लोकमान्य टिळक हॉस्पीतल, सायन, मुंबई) व उद्योजक विलासजी शिंदे (चेअरमन, सह्याद्री अॅग्रोफार्म , नाशिक) यांना प्रदान करण्यात येणार आहेत. तसेच या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा. ना. एकनाथजी शिंदे (नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री - महाराष्ट्र राज्य ) हे उपस्थित राहणार आहेत. तसेच विशेष उपस्थिती अॅड. शाशिकांतजी पवार (संस्थापक अध्यक्ष, अखिल मराठा फेडरेशन ) राजन विचारे खासदार ठाणे, नरेश म्हस्के महापौर, ठाणे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.