कोरोना प्रतिबंध रुग्णालयास नागरिकांचा विरोध

 यांच्याशी चर्चा केल्यानंतर या ठिकाणी ही सुविधा करण्याचा निर्णय तूर्तास थांबवण्यात आला असून हा वॉर्ड मेंटलला हलवण्याचा पालिकेचा विचार असल्याची माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. श्रीनगर येथे असलेल्या या इमारतीमध्ये तीन मोठे हॉल आणि १२ स्वतंत्र रूम असून या ठिकाणी शुक्रवारी संध्याकाळी उशिरा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी भेट दिली आहे. या इमारतीमध्ये ही तातडीची सुविधा निर्माण कारण्याचा निर्णय शुक्रवारी संध्याकाळी घेण्यात आला होता. त्यादृष्टीने या ठिकाणी साफसफाई आणि इतर तयारी देखील सुरु करण्यात आली होती. त्यामुळे रात्रीच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्मचारी काम करण्यासाठी आले असल्याने ही बातमी वायासारखी या ठिकाणच्या नागरिकांमध्ये पसरली. त्यामुळे आधीच कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली असलेल्या नागरिकांमध्ये अधिक भीतीचे वातावरण पसरल्याने भरवस्तीत जर असे रुग्ण आणले तर आरोग्याचा प्रश्न उपस्थित करत सर्व नागरिकांनी या इमारती जवळ येऊन सफाईचे काम थांबवले . विशेष म्हणजे नागरिकांनीच या इमारतींचा ताबा घेतल्याने पालिकेच्या यंत्रणेला काहीच काम करता आले नाही. अखेर काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे हे घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी प्रभारी आयुक्त राजेंद्र अहिवर तसेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय तूर्तास थांबवण्यात आला असल्याची माहिती मनोज शिंदे यांनी दिली आहे. दुसरीकडे पालिकेच्या सूत्रांनी देखील याला दुजोरा दिला असून अद्याप यावर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आला नसला तरी या इमारतीत हा वॉर्ड देखील सुरु करण्यात आला नसल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. या इमारतीमध्ये छोट्या छोट्या रोम असून प्रत्येकी एका रूममध्ये बाहेरून आलेल्या एका नागरिकाला स्वतंत्र ठेवण्याची सुविधा निर्माण करण्यात येणार आहे. कोरोनाशी लढण्यासाठी ठाणे महापालिकेच्या स्तरावर अनेक उपाय योजना करण्यात येत असून पालिकेच्या रुग्णालयात आणि खाजगी रुग्णालयात देखील सुविधा निर्माण करण्यात आली आहे. यामध्ये रोझा गार्डनिया येथे १५ खाटांची विलगीकरण सुविधा निर्माण करण्यात आली आहे. तसेच कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे ८ खाटांची विलगीकरण आणि खाजगी रुग्णालयांमध्ये १२ खाटांची विलगीकरण सुविधा निर्माण करण्यात आली आहे. याबाबत व्यापक जनजागृती करण्यासाठी महानगरपालिकेच्यावतीने मोठया प्रमाणात कार्यवाही करण्यात येत महापालिकेच्या पुढाकाराने ज्युपिटर हॉस्पिटल येथे २, काळसेकर हॉस्पिटल, मुंब्रा येथे २, वेदांत रुग्णालय येथे ५, कौशल्य हाँ स्पिटल येथे २ आणि बेथनी रुग्णालय येथे २ खाटांची विलगीकरण सुविधा निर्माण करण्यात आली आहे.महापालिकेच्यावतीने रॅपिड रिस्पॉन्स पथक गठीत केले असून आपत्ती व्यवस्थापन कक्षात २४ तास एका डॉक्टरची