ठाणे : प्रत्येक आर्थीक वर्षातील अर्थसंकल्प ३१ मार्च पूर्वी मंजर होऊन उपलब्ध तरतुदीअंतर्गत प्रस्तावित केलेली कामे विहीत मुदतीत पूर्ण होवून नागरिकांना नागरी सेवासुविधा देता याव्यात यासाठी ठाणे महापालिकेचा सन २०२०-२१ च्या अर्थसंकल्पाबाबत वेळीच कार्यवाही करण्याबाबतचे पत्र महापौर नरेश म्हस्के यांनी स्थायी समिती सभापती राम रेपाळे व महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना दिले आहे. आगामी आर्थीक वर्षातील अर्थसंकल्प माहे फेब्रवारीमध्ये प्रशासनाकडन स्थायी समितीस सादर करुन त्यावर लेखाशिर्षकानिहाय जमा मार लाभकानिहाय या खर्चाबाबत निर्णय घेवून अंतिम मान्यतेसाठी महासभेस अर्थसंकल्प सादर करण्यात येतो, यावर सर्वपक्षीय सदस्य त्यांचे प्रभागातील कामांबाबत सूचना करतात किंबहना जमेच्या दृष्टीकोनातूनही उपाययोजना सुचवितात. विविध करांच्या माध्यमातून जमा होणाऱ्या पैशाचा योग्य ताळमेळ घालन शेवटचा रुपया देखील योग्य पध्दतीने खर्च व्हावा या दृष्टीकोनातन सर्वांचाच प्रयत्न असतो. परंतु मागील काही वर्षे या ना त्या कारणाने ३१ मार्चपूर्वी अर्थसंकल्प मंजूर होवून त्याची अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे याचा विपरीत परिणाम नागरी सुविधा कामांवर होत असतो. विकासकामे वेळेत होत नसल्यामुळे नागरिकांचा रोष स्थानिक लोकप्रतिनीधीवर व्यकत होतो. तसेच महापालिका कार्यक्षेत्रातील सुज्ञ नागरिक देखील याबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थीत करीत असतात व महापौर या नात्याने सर्व प्रश्नांना सामोरे जावे लागत असल्याचे महापौर यांनी नमूद केले आहे. त्यामुळे या दाऔर मनी ले जाने माने पुढील काळातील अर्थसंकल्प विहीत मदतीत मंजूर करुन नियोजित कामे वेळेत व्हावीत या दृष्टीकोनातून सन २०२०-२१ चा अर्थसंकल्प ३१ मार्चपूर्वी मंजूर होईल या दृष्टीने कार्यवाही करणेसाठी लेखी सूचना महापौर नरेश म्हस्के यांनी प्रशासनाला दिली आहे.
अर्थसंकल्प ३१ मार्चपूर्वी मंजूर होण्यासाठी प्रशासनाने व स्थायी समितीने वेळीच कार्यवाही करावी : महापौर म्हस्के