अफवाखोर इसमावर भिवंडी पोलिसांनी दाखल केला गुन्हा. आता अफवा पसरविणारची गय नाही.

 


           काल  दि. 27 मार्च ,2020 रोजी रात्री एक वाजताचे सुमारास  नियंत्रण कक्ष ठाणे येथून कळविले की दोन महिला व एक पुरुष यांचा खून करण्यात आला असून त्यांना  एका वाहनामधून नेण्यात आहे. ते ब्रह्मानंदनगर, कामतघर  येथील आशीर्वाद हॉस्पिटल येथे आहेत.
असे  कॉलर ने कळविले होते. 


नमूद  कॉलच्या अनुषंगाने  त्वरित तपास पथकाचे अधिकारी कर्मचारी यांनी आशीर्वाद हॉस्पिटलचा शोध घेतला. परंतु नमूद हॉस्पिटल कोठेही आढळुन आले नाही.


 त्यानंतर पुन्हा   ठाणे नियंत्रण कक्ष यांनी गाडीचा नंबर MH06/W 4241  कळविला असता, गाडीचा शोध घेतला. सदरची गाडी दिलेल्या नंबर प्रमाणे तुळजाभवानी मंदिरा जवळ ब्रह्मानंदनगर, कामतघर येथे आढळून आली. 
 सदर गाडीमध्ये काहीही आढळून आले नाही.  त्यानंतर  नमूद कॉलर यास पकडून त्यास नारपोली पोलीस ठाणे येथे आणून त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता ,त्यांनी सांगितल्याप्रमाणे कुठलाही प्रकार आढळून आलेला नाही.   नमूद इसम कृष्णा महादेव चेवले, वय 50 वर्ष,रा ब्रह्मानंदनगर भिवंडी यांचेवर  भादवि कलम 182 प्रमाणे  गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
  अशा परिस्थिती अफवा पसरविणारावर भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी कठोर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस स्टेशनला आदेश दिले आहेत.