ठाणे महापौरचषक जलतरण स्पर्धेत स्टार फिशने पटकाविली १० सुवर्ण, ४ रौप्य व ११ कांस्यपदके

 



ठाणे : नुकत्याच दि ठाणे क्लब, रहेजा गार्डन येथे झालेल्या ठाणे महापौर चषक जलतरण स्पर्धे त स्टारफिश स्पोटर्स फाऊंडेशनचे जलतरणपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेत फ्री स्टाईल, ब्रेस्ट स्ट्रोक, बटरफ्लाय, बॅक स्ट्रोक, रिले या विविध प्रकारातील क्रीडा स्पर्धेत तब्बल २४ पदके पटकाविली. विजेत्या जलतरणपटूंना उपमहापौर पल्लवी कदम, नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा नम्रता पमनानी, नगरसेविका सुखदा मोरे, परिवहन सदस्य व महाराष्ट्र राज्य जलतरण संघटनेचे सदस्य राजेश मोरे यांच्याहस्ते पदक व प्रशस्तीपत्रक देवून सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेत १२ वर्षाखालील गटात ईदान चतुर्वे दी यांने बॅकस्ट्रोक या प्रकारात सुवर्णपदक, फ्री स्टाईल व वैयक्तीकमिडले प्रकारात प्रत्येकी १ रौप्यपदक पटकाविले. १० वर्षाखालील गटात आदित्य घाग याने फ्री स्टाईल प्रकारात १ सुवर्ण, २०० मीटर वैयक्तीकमिड ले व रिले प्रकारात प्रत्येकी १ सुवर्णपदक पटकाविले. तर ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात रौप्यपदक प्राप्त केले. विहान चतुर्वेदी याने ५० मीटर बॅकस्ट्रोक व रिले प्रकारात प्रत्येकी १ सुवर्णपदक प्राप्त केले. वैयक्तीक मिड-ले या प्रकारात कांस्यपदक प्राप्त केले. परीन पाटील याने रिले या प्रकारात १ सुवर्ण, बटरफ्लाय या प्रकारात १ कांस्यपदक प्राप्त ८ वर्षाखालील गटात विराट ठक्कर याने ५० मीटर बॅकस्ट्रोक, फ्री स्टाईल व रिले या प्रकारात प्रत्येकी १ सुवर्णपदक पटकाविले. ६ वर्षाखालील गटात आयाना गाला हिने ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात १ कांस्यपदक प्राप्त केले. सोहम साळुखे, श्री लोखंडे, मानव मोरेआयुषी आखाडे, समृध्दी गुंडप, फ्रेया शहा, श्रृती जांभळे या सर्व जलतरणपटूंनी रिले या प्रकारात कांस्यपदक पटकाविले. तर संपूर्ण स्पर्धेत ईदांत चतुर्वेदी व विराट ठक्कर यांनी वैयक्तीक विजेतेपद पटकाविले. हे सर्व जलतरणपटू ठाणे महापालिकेच्या कै. मारोतराव शिंदे तरण तलाव येथे सराव करीत असून प्रशिक्षक अतुल पुरंदरे व कैलास आखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणाचे धडे घेत आहेत.या सर्व जलतरणपटूंना उपायुक्त संदीप माळवी, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर व क्रीडा अधिकारी मीनल पालांडे यांचे सहकार्य लाभले.