उद्वोगांच्या पाणीपट्टी दरातही होणार दरवाढ

 


ठाणे (प्रतिनिधी)- घरगुती वापराच्या पाणीपट्टीवर ४० ते ५० टक्के दरवाढ करण्याच्या निर्णय घेतल्यानंतर वाणिज्य स्वरूपाच्या पाणीपट्टीच्या दारात देखील वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यामध्ये सर्वप्रकारच्या वाणिज्य आस्थापनांबरोबर सरकारी शाळा, धार्मिक स्थळे आणि बँकांचा देखील समावेश आहे .केवळ पाणीपट्टीच नव्हे तर रस्ता फोड फी आणि टँकरच्या दरातही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या महासभेत हा करवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी आणण्यात आला आहे महसुली तूट भरून काढण्यासाठी ठाणेकरांवर दरवाढ करण्याचा अजेंडा आता प्रशासनाच्या वतीने घेण्यात आला असून याचाच एक भाग म्हणून घरगुती पाणीपट्टी बरोबर वाणिज्य स्वरूपातील पाणीपट्टी दरात देखील वाढ करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे . वाणिज्य स्वरूपातील पाणी दरात १५ ते ३० रुपयांवरून आहे . वा ३० ते ६० रुपयांची वाढ प्रती हजार लीटर मागे प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यानुसार या वाणिज्य वापरांच्या लोकांना मासिक ५०० ते २५ हजारापर्यंतचा वाढीव पाणी बिलाचा भार सहन करावा लागणार आहे. तात्पुरत्या स्वरुपात पाणी कनेक्शन घेणाऱ्या धार्मिक व इतर सर्व कामांसाठी कनेक्शन घेणाऱ्यांच्या पाण्याचे दर बदलणार आहेत. त्यानुसार हे अर्धा इंचासाठीचे दर ३०० वरुन ५०० आणि १ इंचासाठी ५०० वरुन ७०० आकारण्याचे प्रस्तावित आहे. दुसरीकडे आतार्पयत एखादा पाण्याच्या टँकर मागविला गेला तर त्यासाठी १ हजार रुपये मोजावे लागत होते, त्यात आता ५०० रुपयांची वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे. तर व्यावसायिक वापरासाठी १५०० रुपयाऐवजी २००० मोजावे लागणार आहेत. खाजगी टकर भरण्यासाठी प्रती फेरा (घरगुती वापरासाठी १० हजार ली. साठी) ७०० ऐवजी १ हजार, व्यावसायिक वापरासाठी फक्त पाणी भरणे १२०० ऐवजी १७०० रुपये मोजावे लागणार आहेत. रस्ता फोड फी मध्येही होणार दरवाढ - पाणी पुरवठा विभागाने आता विविध फीचे दरही निश्चित केले आहेत. त्यानुसार रस्ता फोड फीमध्ये २ हजारावरुन ३ हजार वाढ प्रस्तावित करण्यात आली आहे , कनेक्शन टॅपिंग फी १ हजारावरुन २ हजार त्यातही अर्धा इंच आणि एक इंचाचे दरही वेगळे असणार, मीटर टेस्टिंग फी अर्धा इंच जुन्यासाठी १०० तर नव्यासाठी १२० होते ,आता जुन्यासाठी २०० आणि नव्यासाठी २५० रुपये अशा पध्दतीने दरवाढ प्रस्तावित करण्यात आली आहे.