भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना

 


ठाणे दि १४ जिमाका : अनु. जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही.अशा विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षण घेता यावे म्हणून भोजन,निवास व इतर शैक्षणिक सुविधा उपलब्ध करुन घेण्यासाठी शासनाने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना स्वाधार योजना सुरु केली आहे. या योजने मध्ये सन २०१९-२० मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरला नाही त्यांनी नव्याने लवकरात लवकर स्वाधार योजनेचा अर्ज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,ठाणे येथे दि.२५ फेब्रुवारी २०२० पर्यंत सादर करावेत. स्वाधार या योजनेकरीता ज्या विद्यार्थ्यांनी सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,ठाणे या कार्यालयात अर्ज सादर केलेले आहे त्या विद्यार्थ्यांनी ७५ टक्के उपस्थिती अहवाल अद्यापपर्यंत या कार्यालयास सादर केलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर उपस्थिती अहवाल महाविद्यालयाकडून घेवून त्वरीत या कार्यालयास सादर करावे.जेणेकरुन स्वाधारची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ जमा करण्यात येईल.असे आवाहन सहाय्यक आयुक्त,समाजकल्याण ठाणे बलभीम शिंदे यांनी केले आहे.



ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे "संत सेवालाल महाराज' यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी सभागृह नेते अशोक वैती, उप आयुक्त संदीप माळवी तसेच महापालिका कर्मचारी आदी उपस्थित होते.