ठाणे : संपूर्ण महाराष्ट्रात शिवकार्यासाठी कार्यरत असलेल्या शिवशंभु प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ठाणे शहरात उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. या सोहळयास ठाणेकरांनी मोठया संख्येने उपस्थित रा राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष सत्यवान जाधव यांनी केले आहे. शिवशंभु प्रतिष्ठानच्यावतीने सकाळी ९ वाजता नितिन कंपनी यथाल छात्रपतता शिवाजा महाराजाच्या प्रातमस पुष्पहार अपण करून रॅलीची सुरूवात करण्यात येईल. ही रॅली नितिन कंपनी पासुन ते तिन हात नाका, गोखले रोड, ठाणे स्टेशन रोड मार्गे तलावपाळा या तलावपाळी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार अर्पण करून रॅलीची सांगता करण्यात येईल, तलावपाली येथे छत्रपता छत्रपती शिवाजी महाराज यांना मुजरा करण्यासाठी येणार्या सर्व शिवभक्तांसाठी तलावपाली येथे संघटनेच्या वतीने पाणी वाटप करण्यात येणार आहे. शिवशंभु प्रतिष्ठानतर्फे महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहिम राबविली जात आहे तसेच गडकिल्ले सुरक्षित व सुस्थितीत राखण्यासाठी संस्थेचे पदाधिकारी नहमीच सक्रीय सहभाग घत असतात. सस्थच्या या उपक्रमाच राज्यभरातून कौतूक केले जात आहे.
शिवशंभु प्रतिष्ठानतर्फे शिवजयंती महोत्सवाचे आयोजन