ठाणे जिल्ह्यात तीन अतिरिक्त स्थानिक सुट्टया जाहीर नवी मुंबई : ठाणे जिल्ह्यातील महसूल हद्दीमध्ये येणाऱ्या शासनाच्या सर्व खात्यामधील कार्यालयाकरिता शासनाने जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्टयांव्यतिरिक्त अतिरिक्त तीन स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत. विभागीय आयुक्तांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार दि.०३ ऑगस्ट २०२० नारळी पौर्णिमा रक्षाबंधन, दि. २७ ऑगस्ट २०२० ज्येष्ठगौरी विसर्जन, दि. १३ नोव्हेंबर २०२० दिवाळी (धनत्रयोदशी) हे दिवस स्थानिक सुट्टयांचे दिवस म्हणून जाहीर करण्यात आले आहेत. असे कोकण विभागीय आयुक्त, शिवाजी दौंड यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
ठाणे जिल्ह्यात तीन अतिरिक्त स्थानिक सुट्टया जाहीर