ठाणे - जिल्ह्यात विशेष क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम दिनाक १६ ते २२ मार्च २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे. ही मोहीम भिवंडी, कल्याण या ग्रामीण तालुक्यासह ठाणे, कल्याण-डोंबिवलीउल्हासनगर, नवी मुंबई, मिरा-भाईंदर, या महानगर पालिका क्षेत्रात राबविण्यात येणार असून या मोहिमेत सर्व शासकीय व अशासकीय संस्थांनी सक्रीय सहभाग घेऊन मोहीम यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ब. भि. नेमाने यांनी केले आहेया अनुषंगाने आज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात समन्वय सभा संपन्न झालीयावेळी सहायक संचालक डॉ. गीता खरात-काकडे यांनी मोहिमे विषयी सविस्तर माहिती दिली. ही मोहीम अतिजोखीमग्रस्त भागात राबविण्यात येणार असून यामध्ये झोपडपट्टी, वीटभट्टी, भटक्या जमातीकामासाठी स्थलांतरीत, खाणीमध्ये काम करणारे बेगर कामगार,आदि सामाजिक गट तसेच तुरुंग, वृद्धाश्रमआश्रमशाळा, वस्तीगृह, मनोरुग्णालय आदि. ठिकाणाचा समावेश असणार आहे. अतिजोखीम ग्रस्त लोकसंख्या असणाया भागात क्षयरोग व कुष्ठरोगाची लक्षणे असणाया व्यक्तीस त्वरित शोधून त्यांची वैदकीय अधिकारी यांच्या कडून तपासणी व योग्य औषधोपचार तातडीने सुरु करता यावा या दृष्टीकोनातून प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवी पथकामार्फत गृहभेटीद्वारे, घरोघरी सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यात विशेष क्षयरोग व कुष्ठरोग शोध मोहीम