वागळे इस्टेट येथील एकता मित्र मंडळाच्यावतीने होळी पौर्णिमेचे औचित्य साधत कोरोनासारख्या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी डेनिस कंपाउंड स्वा. सावरकरनगर ठाणे येथे लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करून सर्व रहिवाशांना मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांना सत्कार करण्यात आला. यावेळी शिव अभिमान व्यायाम मंदिराचे अध्यक्ष राजीव शिरोडकर, एज्युकेशन क्लासेसचे संचालक रविंद्र प्रजापती, अमित राजपुत व विभागातील पदाधिकारी, शिव अभिमान महिला मंडळ व समस्त रहिवासी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एकता मित्र मंडळाच्या सभासदांनी विशेष परिश्रम घेतले.
कोरोना जागरुकता : सावरकरनगर येथे मास्कचे वाटप