ठाणे(प्रतिनिधी) - कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी ठाण्यातील श्रीनगर येथे सुविधा भूखंडाच्या माध्यमातून बांधण्यात आलेल्या पाच माजली इमारतीमध्ये २५ खाटांची व्यवस्था करण्याचा तातडीने शुक्रवारी संध्याकाळी ठाणे महापालिकेच्या वतीने निर्णय घेण्यात आला असला तरी, या ठिकाणी रुग्णांना ठेवण्यास स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. भरवस्तीत ही इमारत असल्याने या ठिकाणी अशा प्रकारचे रुग्ण ठेवल्यास नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होणार असल्याने शुक्रवारी संध्याकाळी नागरिकांनीच या इमारतीचा ताबा घेतला. अखेर काँग्रेसचे शहर अध्यक्ष मनोज शिंदे यांनी प्रभारी पालिका आयुक्त राजेंद्र अहिवर (पान २ वर
कोरोना प्रतिबंध रुग्णालयास नागरिकांचा विरोध